इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी तसेच जिल्यातील विविध फार्मसी महविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ते ११ जानेवारी दरम्यान ५८ वा " नॅशनल फार्मसी वीक " साजरा केला जात आहे.
सप्ताहाच्या निम्मिताने मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी व्हॉलीबॉल व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच फार्मसी क्षेत्रातील सर्व विध्यार्थी शिक्षकांची ओळख व्हावी या उद्देशाने महाविद्यलयात फार्मसी सप्ताह साजरा केला जात असतो.
व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी ३६ महविद्यालयाचे संघांनी सहभाग नोंदवला. तर चित्रकला स्पर्धासाठी ४० स्पर्धक सहभागी झाले. विध्यार्थ्यानी विविध सामाजिक विषयांवर संदेश देणारे चित्र काढले. मोठ्या उत्साहात स्पर्धा पार पडली.
व्यासपीठावर मातोश्री एज्युकेशन सोसायटी चे सचिव श्री कुणाल दराडे, मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले, गोखले कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सुनील अमृतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तित होते. तसेच श्री अमोल पाटील, श्री पंकज पाटील हे देखील उपस्तित होते. प्रा. प्रशांत व्यवहारे आणि आणि प्रा. अमित गायकवाड यांचे स्पर्धेत विशेष सहकार्य लाभले. तसेच प्रा. सचिन कापसे, प्रा.प्रशांत चव्हाण , प्रा.पूनम पाटील , प्रा. प्रवीण खामकर तसेच इतर शिक्षकवृंद उपस्तित होते.